नवी मुंबई- नेरुळच्या सेक्टर 4 मधील एका सोसायटीमध्ये जीवनावश्यक वस्तूची, होम डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या डी मार्टच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. विशेष बाब म्हणजे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन डी मार्टचे कर्मचारी वस्तूंची डिलिव्हरी नागरिकांना देत होते. या मारहाणीची घटना सोसायटीमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
नवी मुंबई परिसरात लॉकडाऊनच्या नियमांचे पालन योग्य पद्धतीने केले जात आहेत. रविवारी नेरुळमधील सेक्टर ४ च्या अमेय सोसायटीमधील नागरिकांनी डी मार्ट मधून जीवनावश्यक वस्तूंची ऑर्डर केली होती. तेव्हा डी मार्टचे कर्मचारी त्या वस्तू घेऊन सोसायटीमध्ये आले.