महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पतीची हत्या, बाथरूममध्ये पडल्याचा केला बनाव - पत्नीकडून पतीला मारहाण

बोईसर पोलीस ठाणे हद्दीतील गणेशनगर परिसरात अरुण मौर्य (२९) व त्यांची पत्नी कविता मौर्य (२२) राहत होते. पत्नी कविता अरुण यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घेत होती. यामुळे कविताने लोखंडी रॉडने पतीला मारहाण केली. त्यात अरुण यांना गंभीर दुखापत झाली. त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून पतीची हत्या
विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून पतीची हत्या

By

Published : May 21, 2020, 1:24 PM IST

Updated : May 21, 2020, 1:30 PM IST

पालघर -पती बाथरूममध्ये पडल्याचा बनाव करून एका महिलेने तिच्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना बोईसर येथे घडली आहे आहे. पोलीस तपासात हा सर्व प्रकार उघड झाला असून याप्रकरणी पत्नी कविता मौर्य हिला बोईसर पोलिसांनी अटक केली आहे.

विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून पतीची हत्या
विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून पतीची हत्या
बोईसर पोलीस ठाणे हद्दीतील गणेशनगर परिसरात अरुण मौर्य (२९) व त्यांची पत्नी कविता मौर्य (२२) हे दाम्पत्य राहत होते. अरुणची पत्नी कविता आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घेत होती. या वादामुळे पत्नी कविताने लोखंडी रॉडने पतीला मारहाण केली, त्यात पती अरुण यास गंभीर दुखापत झाली. आपल्या पतीला बाथरूममध्ये पडल्यामुळे दुखापत झाल्याची माहिती तिने १८ मे रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करताना दिली. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बोईसर पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता, महिलेच्या मोबाइलमध्ये पतीला मारहाण केल्याचे व्हिडिओ असल्याचे समोर आले. मात्र, या महिलेने मारहाण करताना काढलेले व्हिडिओ डीलीट केले होते. पोलीस उपनिरीक्षक आशिष पाटील यांनी मोबाइलमधून डीलीट केलेली सर्व माहिती मिळवली. आरोपी कविता मौर्य हिने गुन्ह्याची कबुली दिली असून या महिलेला अटक करण्यात आले आहे.
Last Updated : May 21, 2020, 1:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details