महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आईने मुलीची हत्या करुन आत्महत्या केल्याप्रकरणात पतीला अटक; सुसाइड नोटवरुन खुलासा - Pragya Parkar

ठाण्याच्या कळवा गौरी सुमन सोसायटी मधील दुसऱ्या मजल्यावर या मायलेकी राहत होत्या.  शुक्रवारी सकाळच्या सुमारास अभिनेत्री प्रज्ञा पारकर हिने राहत्या घरात मुलगी श्रृती ( वय17) हिचे तोंड, नाक आणि गळा दाबून हत्या केली. याप्रकरणी प्रज्ञा हिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. तर, पती प्रशांत पारकर यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

हत्या करुन आत्महत्या

By

Published : Aug 13, 2019, 7:15 PM IST

ठाणे - हृदय हेलावून टाकणारी नुकतीच एक घटना ठाण्यात घडली. यात अभिनेत्री प्रज्ञा पारकर हिने पोटच्या मुलीची हत्या केल्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली होती. सध्या या प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून प्रज्ञा पारकर हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती प्रशांत पारकरला अटक करण्यात आली आहे. प्रज्ञा पारकर हिने लिहिलेल्या सुसाईड नोटवरुन ही माहिती समोर आली आहे.

आईने मुलीची हत्या करुन आत्महत्या केल्याप्रकरणात पतीला अटक


ठाण्याच्या कळवा गौरी सुमन सोसायटीमधील दुसऱ्या मजल्यावर या मायलेकी राहत होत्या. शुक्रवारी सकाळच्या सुमारास अभिनेत्री प्रज्ञा पारकर हिने राहत्या घरात मुलगी श्रृती (वय 17) हिची तोंड, नाक आणि गळा दाबून हत्या केली. त्यानंतर स्वतःही किचनरुममधील पंख्याला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी प्रज्ञा हिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. तर, पती प्रशांत पारकर यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, प्रज्ञा हिने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये अनेक बाबींचा उलगडा झाला आहे.


चिठ्ठीच्या पान नंबर 1 वर श्रृतीसकट आत्महत्या करत आहे. फसलेले लग्न, तुटलेल्या संसाराचे ओझे आता नाही जमत कॅरी करायला. प्रशांत सोडून माझ्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही, असे स्पष्ट म्हटले आहे. त्यानुसार, प्रशांत याने वेळोवेळी दिलेल्या मानसिक त्रसामुळे प्रज्ञा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिसांनीच प्रशांत पारकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी प्रशांत याला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास कळवा पोलीस करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details