ठाणे- अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याची खळबळजनक घटना भिवंडीत उघड झाली आहे. आरोपी तरुणाने मुलीला धर्मांतर करुन लग्न करण्याचे आश्वासनही दिले होते. वेळोवेळी भूलथापा मारत आणि धमकावत तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.
लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या प्रियकरास अटक - thane crime
अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याची खळबळजनक घटना भिवंडीत उघड झाली आहे.
![लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या प्रियकरास अटक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2997665-thumbnail-3x2-thane.jpg)
या प्रकरणी प्रियकराविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बडखा यादव ( २२ रा.रामनगर ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. १६ वर्षीय युवतीस मला तू आवडतेस. माझे तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. तू अठरा वर्षांची होईपर्यंत मी लग्न करण्यास थांबेन व तुझ्यासाठी धर्म बदलून लग्न करेन, असे सांगून त्याने पीडित युवतीवर वेळोवेळी अत्याचार केला. यात ती गरोदर राहिली असता त्याने लग्नास नकार देऊन युवतीची फसवणूक केली. यामुळे फसगत झालेल्या युवतीने शांतीनगर पोलीस ठाण्यात प्रियकराविरोधात बलात्कार व धमकीचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी आरोपीला अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास एपीआय दुर्गेश दुबे करीत आहे.