ठाणे - तुझ्यासाठी बायकोला सोडलं आणि आता तू लग्नाला का नकार देतेस, असे बोलून एका विवाहित प्रियकराने प्रेयसीला भर रस्त्यात बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे. अजित कनोजिया असे या प्रियकराचे नाव आहे.
पीडित तरुणी कल्याण पूर्वतील कचोरे परिसरात राहते. ती कल्याण पश्चिमेतील सर्वोदय मॉलमध्ये एका दुकानात कामाला आहे. ही तरुणी आपले काम आटोपून मॉलच्या खाली आली असता, आरोपी प्रियकराने तिच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर तिला भर रस्त्यात बेदम मारहाण सुरु केली. काही नागरीकांनी मारहाण करणाऱ्या आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता, तो घटनास्थळावरून पळून गेला.