महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Crime विवाहित प्रेयसीचा लग्नासाठी तगादा: प्रियकराने ३५ वार करून केला निर्घृण खून, पोलिसांनी आवळल्या मुसक्या - पुण्यात झाली ओळख अन् गोवेलीत खून

बीडचा जयराम हा कामानिमित्त पुण्यात राहत होता. त्याची पुण्यातील तीन लेकराची आई असलेल्या रुपांजलीसोबत ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्याने रुपांजली जयरामकडे लग्नाचा तगादा लावत होती. मात्र तीन मुलांच्या विवाहित प्रेयसी लग्नाचा ( Police Arrested Accused In Married Girlfriend Murder ) तगादा लावत असल्याने जयरामने कल्याणच्या जंगलात ( Kalyan Forest ) नेत रुपांजलीवर 35 वार करुन तिचा खून केला. कल्याण पोलिसांनी जयरामसह त्याच्या साथिदाराच्या मुसक्या आवळल्या

Kalyan Police Arrested Accused
प्रेयसीचा खून करणारा जयराम आणि त्याचा साथिदार

By

Published : Jan 5, 2023, 2:14 PM IST

ठाणे - विवाहित प्रेयसीने लग्नाचा तगादा ( Girlfriend Murder At Kalyan Forest) लावल्यावरुन वैतागलेल्या प्रियकराने 35 वार करुन तिचा निर्घृण खून केल्याने खळबळ उडाली. ही घटना कल्याणच्या ( Kalyan Forest ) जंगलात 27 डिसेंबरला उघडकीस आली होती. याप्रकरणी कल्याण पोलिसांनी ( Kalyan Police Station ) मारेकरी प्रियकराच्या मुसक्या ( Police Arrested Accused In Married Girlfriend Murder ) आवळल्या आहेत. जयराम उत्तरेश्वर चौरे असे त्या मारेकरी प्रियकराचे नाव असून सुरज गोलू धाटे असे त्याच्या साथिदाराचे नाव आहे. रुपांजली संभाजी जाधव असे खून करण्यात आलेल्या प्रेयसीचे नाव आहे.

बीडचे नागरिक, पुण्यात झाली ओळख अन् गोवेलीत खूनबीड येथील रहिवासी असलेला जयराम उत्तरेश्वर चौरे हा पुण्यात राहत होता. तसेच मृत रुपांजली ही पुण्यात आपल्या पती व तीन मुलासह राहत होती. त्यातच आरोपीही पुण्यात राहत असल्याने दोघांची ओळख झाली. त्यानंतर आरोपी जयराम आणि रुपांजलीचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध निर्माण होऊन शारीरिक संबध प्रस्थापित झाले. मात्र गेल्या काही महिन्यापासून रुपांजली ही प्रियकर जयरामकडे लग्नाचा तगादा लावत होती. त्यामुळे प्रियकर जयरामने त्याचा मित्र सूरजशी संगनमत करून रुपांजलीच्या खुनाचा पुण्यातच कट रचला.

गोवेलीच्या जंगलात सोने सापडल्याचा बनावआरोपी जयरामने कट रचल्याप्रमाणे प्रेयसी रुपांजलीला मला गोवेलीच्या जंगलात सोने सापडले असून तू माझ्यासोबत चल म्हणून तिला बहाण्याने पुण्यातून कल्याण ग्रामीण भागातील जंगलात आणले. त्यानंतर तिच्यावर धारदार हत्याराने ३५ वार करून तिचा निर्घृण खून करून कल्याण तालुक्यातील गोवली जंगलात तिचा मृतदेह सोडून दोन्ही आरोपींनी पळ काढला होता. त्यानंतर २७ डिसेंबर रोजी गोवली जंगलात एका अनोळखी महिलेचा निर्घृण खून केलेला मृतदेह ( Married Girlfriend Murder At Kalyan) आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला.

मृतदेहाजवळील आधारकार्डाने लागला सुगावाघटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपविभागीय अधिकारी राम भालसिंग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक संदिप शिंगटे, हवालदार दर्शन सावळे, इरफान सय्यद, नाईक राहुल बागुल, कॉन्स्टेबल योगेश वाघेरे यांनी गंभीर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध तात्काळ सुरु केला. दुसरीकडे मृतदेहाजवळ आढळून आलेल्या आधारकार्डावरून मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी सोशल माध्यमांचा आधार घेतला. सोशल माध्यमांद्वारे मृत महिलेचे मित्र व नातेवाईक यांची माहिती पोलीस पथकाने प्राप्त केली. यावेळी जयरामसोबत मृत रुपांजलीचे प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक पुराव्याने कौशल्यपूर्ण तपास सुरु केला. विशेष म्हणजे आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक चाकण, पुणे व बीड या ठिकाणी दबा धरुन बसले होते. त्यामुळेच ४८ तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.

ABOUT THE AUTHOR

...view details