महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांची पोलिसांकडून धरपकड

सिडकोकडून काहीही पावले उचलली जात नसल्याने आज प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले व त्यांनी सिडकोला घेराव घातला. यामध्ये पनवेल तालुक्यातील 10 बाधित गावांचा समावेश आहे. मात्र, सिडकोच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला व बाधित प्रकल्पग्रस्तांची धरपकड करून पनवेल शहर, नेरुळ रबाळे एनआयआर या पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

By

Published : Oct 27, 2020, 4:55 PM IST

police arrest victims of navi mumbai airport project
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांची पोलिसांकडून धरपकड

नवी मुंबई -गेल्या कित्येक दिवसांपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित मागण्यांप्रती आक्रमक झाले आहेत. मात्र, सिडकोच्या माध्यमातून टोलवाटोलवी करण्यात येत आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटीच्या माध्यमातून सिडकोभवनला बाधित ग्रामस्थांकडून घेराव घालण्यात आला.मात्र हे आंदोलन पोलीस व सिडकोच्या माध्यमातून दडपण्यात आले आहे. तसेच प्रकल्पग्रस्तांची धरपकड करून, एनआयआर, नेरुळ, रबाळे, पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आले असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांची पोलिसांकडून धरपकड

जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे घर बांधून पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बाजारभावाप्रमाणे सिडकोच्या माध्यमातून भाडे मिळालेच पाहिजे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित झालेल्या मच्छीमार व्यवसायिकांना 2013च्या भूसंपादन कायद्याप्रमाणे नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, शून्य पात्रता व अपात्रता रद्द करून सरसकट सर्वांना नुकसानभरपाई मिळावी. अ ब क ड घरांचे स्वतंत्र भूखंड, घरभाडे, निर्वाह, भत्ता, कृषी मजुरीचे स्वातंत्र्य कुटूंब म्हणून वाटप व्हावे, तसेच 18 वर्षीय युवक युवतींना प्रकल्पग्रस्तांचा दाखला योग्य ते प्रशिक्षण व रोजगार मिळायला हवा, खासगी मंदिराचे भूखंड व बांधकाम खर्च भूधारकांना मिळाले पाहिजे

याप्रमाणे अनेक मागण्या कित्येक दिवसांपासून प्रकल्पग्रस्त सिडकोकडे करत आहेत. मात्र, सिडकोकडून काहीही पावले उचलली जात नसल्याने आज प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले व त्यांनी सिडकोला घेराव घातला. यामध्ये पनवेल तालुक्यातील 10 बाधित गावांचा समावेश आहे. मात्र, सिडकोच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला व बाधित प्रकल्पग्रस्तांची धरपकड करून पनवेल शहर, नेरुळ रबाळे एनआयआर या पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details