महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संचारबंदी असतानाही घराबाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांच्या दंडुक्यांचा प्रसाद - citizens come on streets during curfew

कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता राज्य सरकारने सोमवारपासून संचारबंदी लागू केली. त्यामुळे सर्व नागरिकांनी घरात राहणे आवश्यक आहे. असे असतानाही नागरिक घराबाहेर पडत आहे. अशा बेशिस्त नागरिकांना शिस्त लावण्यासाठी अनेक ठिकाणी पोलीस अशा नागरिकांना काठीचा प्रसाद देत आहेत.

curfew in thane
संचारबंदी असताना रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद

By

Published : Mar 24, 2020, 1:04 PM IST

Updated : Mar 24, 2020, 1:44 PM IST

ठाणे - संचारबंदी असताना कोणीही अत्यावश्यक बाब वगळता घराबाहेर पडणे अपेक्षित नसते. त्यामुळे राज्यात काल सोमवारपासून संचारबंदी लागू केल्यानंतर नागरिकांनी घरात रहावे, असे आवाहन सगळ्या माध्यमातून केले जात आहे. तरिही नागरिक रस्त्यावर येत बाजारांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. अशा वेळी नागरिकांना शिस्त लावण्यासाठी नाईलाजास्तव पोलिसांना काठीचा वापर करावा लागत आहे.

हेही वाचा...वसईत आढळला कोरोनाचा एक रुग्ण, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 97 वर

नागरिकांना आम्ही विनंती करत आहोत की, त्यांनी घरात रहावे. जेणेकरून कोरोनाची साखळी तुटेल व संक्रमणाचा धोका कमी होईल. परंतु नागरिक याला न जुमानता रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे धोका दिवसागणिक वाढत आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त नीता पडवी यांनी दिली. नागरिकांच्या आणि पोलिसांच्या सहकार्यानेच हे संकट दूर होण्यास मदत होईल, त्यामुळे सर्वांनी घरीच रहावे व प्रशासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन नीता पडवी यांनी केले आहे.

Last Updated : Mar 24, 2020, 1:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details