ठाणे - गुंडाना खा्क्या दाखविणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी दिव्यात चक्क सर्वसामान्याला खाक्या दाखवत मारहाण केली. यात तरुणाच्या नाकातून रक्त निघाले. पोलीस अधिकाऱ्याच्या या मनमानी कारभाराचा जाब विचारण्यासाठी भूमिपुत्रांनी मोर्चा काढीत दिवा पोलीस चौकीत शिंदे याना घेराव घातला. त्यानंतर शिंदेंना अखेर माफी मागावी लागली. कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस अधिकारीच कायदा हातात घेऊन दहशत माजवीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. याबाबत पोलीस आयुक्त फणसळकर या अधिकाऱ्यावर काय कारवाई करतात याकडे दिवावासियांचे लक्ष लागले आहे.
मारहाणीचा जाब विचारण्यासाठी नागरिकांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा; एपीआयने मागितली माफी - blood
दातीवली येथील एका तरुणाला शिंदे यांनी बेदम मारहाण केल्याने त्याच्या नाका-तोंडातून रक्त येऊ लागले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट दिवा पोलीस चौकीत जाऊन शिंदे यांना घेराव घातला. गोंधळलेल्या शिंदेंनी नागरिकांची माफी मागितली.
दिव्यात सर्वसामान्य माणसाला त्रास देणाऱ्या गुंड प्रवृत्तीची लोक मुक्त फिरत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांना वेळ नाही. मात्र सर्वसामान्य माणसावर, रिक्षाचालकांवर नियमावर बोट दाखवत खाक्या दाखविण्याचा प्रकार दिव्यात शिंदे यांनी बऱ्याचवेळा केला आहे. दातीवली येथील एका तरुणाला शिंदे यांनी बेदम मारहाण केल्याने त्याच्या नाकातोंडातुन रक्त येऊ लागले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट दिवा पोलीस चौकीत जाऊन शिंदे यांना घेराव घातला. गोंधळलेल्या शिंदेंनी नागरिकांची माफी मागितली. मात्र हा विषय माफी मागून संपणार नाही. शिंदे यांच्यासारख्या पोलीस खात्याचा दुरुपयोग करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी व्हायला हवी. दिव्यातील सामान्य माणसाला त्रास देणारी ही प्रवृत्ती पोलीस प्रशासनाने वेळीच ठेचयाला हवी. आधीच दिवा शहरातील नागरिक अनेक संकटांना तोंड देत असताना हे नवे संकट आता नागरिकांना नको आहे. ठाणे पोलीस आयुक्तांनी शिंदे यांच्या या कृत्याची चौकशी करायला हवी अशी मागणी आता नागरिकांतून होऊ लागली आहे. रिक्षा चालकांना मारहाण केली जात असताना रस्त्यावरील फेरीवाल्यांना साथ कुणाची याचे उत्तर शिंदे यांच्यासारख्या पोलीस अधिकाऱ्यांनाच विचारायला हवे. दिवा शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम ज्यांच्यावर आहे तेच स्वतःला दंबग समजत असतील तर त्यांना ही कायदा समजावून सांगितला गेला पाहिजे, अशी भूमिका दिवा शहरातील सुजाण नागरिक घेत आहेत.