ठाणे -अंबरनाथचा बाल तबला वादक अथर्व लोहार याची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड झाली होती. त्याला आज २२ जानेवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनातील समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अंबरनाथमधील बाल तबला वादक अथर्वला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्कार
बाल तबला वादक अथर्व लोहार याने तबला वादनातून अंबरनाथप्रमाणेच बँकॉक येथे २०१५ ला झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्यावतीने अथर्व लोहार याची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
विशेष म्हणजे वयाच्या दुसऱ्या वर्षांपासून अथर्व लोहार हा तबला वादक म्हणून परिचित आहे. स्थानिक, जिल्हा आणि राज्य स्तरावर अथर्वने तबला वादक म्हणून अनेक पारितोषिके पटकावली आहेत.
बाल तबला वादक अथर्व लोहार याने तबला वादनातून अंबरनाथप्रमाणेच बँकॉक येथे २०१५ ला झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्यावतीने अथर्व लोहार याची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. त्यामुळे अथर्वचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अथर्वला भाविष्यात मोठा तबला वादक व्हायचे असल्याचे त्याने सांगितले.