ठाणे - रामाचा वनवास चौदा वर्ष होता. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले. ठाणे जिल्ह्यातील अनेक दिग्गज खासदार दिल्लीत गेले. अनेक सरकार स्थापन झाले. पण अद्यापही ठाणे जिल्ह्याला केंद्रात स्थान मिळाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाणे जिल्ह्याचा हा मंत्रिपदाचा वनवास संपविला असून ओबीसी चेहऱ्याला माझ्या रूपाने केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले आहे, अशी प्रतिक्रिया पंचायतराज केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यासाठी जन आशीर्वाद यात्रा -
भाजपाची जन आशीर्वाद यात्रा आज (मंगळवार) अलिबागपासून सुरू झाली. तत्पूर्वी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ठाणे जिल्ह्याचा मंत्रिपदाचा असलेला वनवास पंतप्रधानांनी संपविला आहे. केंद्राच्या योजना ह्या सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी आणि जनतेचे आशीर्वाद घेणे, ही जन आशीर्वाद यात्रेची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे. त्यानुसार ही यात्रा सुरू करण्यात आली, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.
भूमीपुत्रांवर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही -