ठाणे : काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा पाऊस, ऑरेंज ऑईल मिश्रित पाऊस पडला होता. तर केमिकलमुळे एमआयडीसीतला रस्ता गुलाबी रंगाचा झाला आहे. त्यामुळे यावरून चर्चा सुरु झाली असून प्रदुषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
हा गुलाबी रंग अजून काही रस्त्यांवर दिसत आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात मोठ्या प्रमाणात केमिकल असल्याचंही समोर आले आहे. या केमिकल मुळे मोठ्या प्रमाणात उग्र दर्प सुटला असून डोळे चुरचुरणे प्रकार घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
डोंबिवलीत आता चक्क गुलाबी रस्ता रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या डोंबिवलीत आज चक्क गुलाबी रस्ता पाहायला मिळाला. डोंबिवली औदयोगिक वसाहतीत मध्ये अनेक रासायनिक कंपन्या असून यामुळे डोंबिवलीकरांना नेहमीच प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. डोंबिवलीतल्या या प्रदुषणामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या आहे.
या भागात मोठ्या प्रमाणावर रसायनांचे कारखाने आहे. हे सर्व कारखाने सुरक्षा आणि पर्यावरणांच्या निकषांचं पालन करत नाहीत. त्यामुळे अनेक अपघात या आधी झालेले आहे. नवनीत राणाची सनी देओल स्टाइल, महिलांच्या प्रश्नावर लोकसभेत आक्रमक. कधी कारखाण्यात स्फोट होणं, कामगारांचा वायु गळतीने मृत्यू होणं, अशा अनेक घटना घडल्या आहेत. काही घटनांमध्ये कारखाण्यात एवढे प्रचंड स्फोट झाले की त्यामुळे सगळा परिसर हादरुन गेला. याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी नागरिक करत असतात. मात्र तात्पुरत्या मलमपट्टीपलिकडे प्रदूषण मंडळ फारसे काहीच करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय.
या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे यांना विचारले असता ते म्हणाले, आम्हाला नुकतीच माहिती मिळाली आहे. अधिकाऱ्यांची टीम त्या रस्त्याकडे पाठवली आहे. ही टीम तांत्रिक तपासणी करील, त्यानंतरच काय प्रकार आहे ते सांगता येईल. मात्र रस्ता लाल रंगाचा कसा झाला हे आत्ता सांगता येणार नसल्याचेही ते म्हणाले.