महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीत माथेफिरूची स्कूल बसवर दगडफेक; महिला गंभीर जखमी - केअरटेकर महिले

बसचा एका दुचाकीला धक्का लागला. यावरून चिडलेल्या माथेफिरुने त्याची दुचाकी बसच्या आडवी लावली. आणि रस्त्यावरील भला मोठा दगड उचलून तो बसच्या काचेवर भिरकावला. त्यात बसची काच फुटून दगड थेट आतमध्ये बसलेल्या केअरटेकर महिलेच्या छातीवर आदळला. त्यात महिला गंभीर जखमी झाली.

काच फुटलेली स्कुल बस

By

Published : Jul 7, 2019, 5:19 PM IST

ठाणे- शाळकरी मुलांना घरी सोडून परतीच्या मार्गावर असलेल्या स्कूल बसची धडक दुचाकीला लागली. त्या रागातून माथेफिरू दुचाकीस्वाराने बसच्या काचेवर भलामोठा दगड फेकून नुकसान केल्याची घटना घडली आहे. ही घटना भिवंडीतील सोमानगर - धामणकर नाका परिसरात घडली आहे.

बसच्या काचेवर भलामोठा दगड फेकून नुकसा

माथेफिरुने केलेल्या दगडफेकीत मुलांच्या बसमध्ये केअर टेकर म्हणून काम करणारी महिला गंभीर जखमी झाली आहे. ज्योती गोपाल चौधरी (वय 35 ) असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून माथेफिरू दुचाकी चालकाला अटक केली आहे. जुनेद अफात अन्सारी (वय 25 रा, भिवंडी सोमानगर) असे आरोपीचे नाव आहे.

भिवंडी तालुक्यातील भावाळे येथील ऑल सेंट इंग्लिश मीडियम स्कूलच्या बसवर ज्योती चौधरी केअरटेकर म्हणून काम करते. शनिवारी सायंकाळी बसमधून मुलांना सोडण्यासाठी त्या अंजुर फाटा येथे गेल्या. नंतर पुन्हा शाळेकडे जाण्यासाठी बसमधून जात होत्या. त्यावेळेस बस सोमानगर येथून येत असताना बसचा एका दुचाकीला धक्का लागला. यावरून चिडलेल्या जुनेदने त्याची दुचाकी बसच्या आडवी लावली. आणि रस्त्यावरील भला मोठा दगड उचलून तो बसच्या काचेवर भिरकावला. त्यात बसची काच फुटून दगड थेट आतमध्ये बसलेल्या ज्योती यांच्या छातीवर आदळला. त्यात ज्योती गंभीर जखमी झाल्या.

सुदैवाने दगडफेकीत मुले बचावली. जखमी महिलेवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. आरोपी जुनेद याच्या विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपीला रविवारी विशेष न्यायालयात हजर केले असता अधिक तपासासाठी पोलीस कोठडी सुनावली आहे. याघटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details