ठाणे - भिवंडी शहरातील विविध पोलीस ठाण्यात खंडणी उकळल्या प्रकरणी चार गुन्हे दाखल असलेल्या एमआयएम शहराध्यक्ष खालिद उर्फ गुड्डू मुख्तार शेख याच्याविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्याने शहरात खळबळ उडाली असून खंडणीबहाद्दर खालिद गुड्डू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, भिवंडी शहरात राहणारी 27 वर्षीय पीडित विवाहित महिला आपल्या अटक असलेल्या पतीला जामीन मिळवून द्यावा, यासाठी मदतीच्या अपेक्षेने आरोपी खालिदकडे गेली होती. डिसेंबर 2016 ते डिसेंबर 2017 या कालावधीत भिवंडीतील समदनगर येथील खालिदच्या कार्यालयात व धामणकर नाका येथील स्टार हॉटेलवरील कार्यालयात वेळोवेळी पीडित महिलेला बोलावून तिच्याशी आरोपी खालिदने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, अशी तक्रार पीडित महिलेने भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.