ठाणे- राहत्या घरासमोर खेळत असलेल्या आठ वर्षांच्या चिमुरडीला रस्ता दाखविण्याचा बहाणा करत निर्जनस्थळी नेऊन एका अज्ञाताने तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेनंतर नराधम फरार झाला असून भिवंडी पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
भिवंडीत रस्ता दाखविण्याच्या बहाण्याने आठ वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून बलात्कार
पीडित चिमुरडी रविवारी सायंकाळच्या सुमाराला घरासमोर खेळत होती. यावेळी एक अज्ञात व्यक्ती रस्ता दाखवण्याचा बहाणा करून तिला उचलून घेऊन गेला. त्यानंतर पीडितेच्या घराच्या पाठीमागे बंद असलेल्या यंत्रमाग कारखान्यात नेवून त्याने तिच्यावर बलात्कार केला.
ही घटना भिवंडीत घडली आहे. पीडित चिमुरडी रविवारी सायंकाळच्या सुमाराला घरासमोर खेळत होती. यावेळी एक अज्ञात व्यक्ती रस्ता दाखवण्याचा बहाणा करून तिला उचलून घेऊन गेला. त्यानंतर पीडितेच्या घराच्या पाठीमागे बंद असलेल्या यंत्रमाग कारखान्यात नेवून त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिला धमकावून तू याबाबत कोणाला काही सांगितले तर तुझा चाकूने गळा कापून टाकेन, अशी धमकी देवून नराधम पसार झाला.
अत्याचाराच्या घटनेनंतर वेदनेने पीडित मुलगी रडू लागल्याने तिच्या आईने विश्वासात घेऊन तिची चौकशी केली असता बलात्काराचा प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक घटनेने व्यथीत झालेल्या मुलीच्या आईने भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ए. व्ही. केदार करत आहेत.