ठाणे- बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. आईचे छत्र हरपलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्या मुलीवरच नराधम बापाने अमानुष बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना भिवंडी तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
धक्कादायक..! १० वर्षीय चिमुरडीवर बापाचा बलात्कार, नराधम अटकेत - नराधम
पीडितेच्या आईचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले. त्यामुळे पीडित मुलगी नराधम बापासह राहत होती. काल (बुधवार) सायंकाळच्या सुमारास पीडित मुलगी एकटी घरात असताना नराधम बापाने तिच्यावर अत्याचार केला.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेच्या आईचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले. त्यामुळे पीडित मुलगी नराधम बापासह राहत होती. काल (बुधवार) सायंकाळच्या सुमारास पीडित मुलगी एकटी घरात असताना नराधम बापाने तिच्यावर अत्याचार केला. यावेळी पीडित मुलगी प्रतिकार करत आरडाओरडा करू लागली. तिचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी तिच्या घरात जाऊन पाहिले असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शेजाऱ्यांनी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी पीडित मुलीच्या जबाबावरून नराधमाविरोधात बलात्कार व पोक्सो कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून आज न्यायलयात हजर करण्यात आले आहे.
हेही वाचा - मोलकरणीचा वृद्ध महिलेवर हल्ला; दागिने घेऊन पसार