महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नराधम मामाचा ६ वर्षीय चिमुरड्या भाचीवर अमानुष अत्याचार; नराधम गजाआड - Sidharth Kamble

टीव्ही पाहण्यासाठी गेलेल्या ६ वर्षीय चिमुकलीवर तिच्याच मावस मामाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भिवंडी शहरातील नवी वस्ती परिसरात घडली आहे. या प्रकरणी नराधमाला १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

भिवंडी शहर पोलीस ठाणे

By

Published : Jul 14, 2019, 7:54 PM IST

ठाणे- शेजारी राहणाऱ्या नातेवाईकाकडे ६ वर्षीय चिमुरडी टीव्ही पाहण्यासाठी गेली असता तिच्यावर मावस मामानेच बळजबरीने अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भिवंडी शहरातील नवीवस्ती परिसरात घडली आहे. मामा भाचीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे परीसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.


याप्रकरणी पीडित चिमुरडीच्या आईने भिवंडी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन नराधम मावस भावाविरोधात तक्रार दाखल करताच पोलिसांनी त्या नराधमाला बेड्या ठोकल्या आहे. अरशद खान (वय २२ वर्षे, रा. अप्सरा टॉकीज, नविवस्ती) असे पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या नराधमाचे नाव आहे.

पीडित चिमुरडी घराशेजारी राहणाऱ्या आपल्या आईच्या मावशीकडे टीव्ही पाहण्यासाठी काल सायंकाळच्या सुमारास गेली होती. त्यावेळी तिच्या आईचा मावसभाऊ असलेला अरशद हा नराधम देखील घरात होता. टीव्ही पाहत असताना त्याने चिमुरडीच्या बालमनाचा फायदा घेत, बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर चिमुरडीला त्रास झाल्याने तिने रडतच तिचे घर गाठले. त्यावेळी तिने घडलेला प्रकार आईला सांगताच तिला धक्काच बसला.

त्यानंतर आईने पीडीतेला घेऊन पोलिस ठाण्यात धाव घेऊन नराधम मावस भावाच्या कृत्याचा पाढा महिला पोलीस अधिकाऱ्या समोर वाचला. यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भिवंडी शहर पोलिसांनी भा.दं.वि. कलम 376 (अ) (ब) , (2) (एफ) (1) (जे) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. नराधमाला आज (रविवार) अटक करून त्याला जिल्हा विशेष सत्र न्यायालयात हजर केले असता, 18 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हनिफ शेख करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details