नवी मुंबई - नवी मुंबईतील महापे शीळ रोडवरुन जाणाऱ्या पेट्रोल टँकरने बुधवारी चारच्या सुमारास अचानक पेट घेतला. वेळीच प्रसंगावधान राखून ट्रक चालक ट्रक बाहेर पडला, त्यामुळे तो बचावला आहे. पेट्रोलची गाडी असल्याने आग अधिकच भडकली असून त्या ठिकाणी स्फोट झाला आहे. सद्यस्थितीत घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
ठाण्यातील महापे-शीळ रस्त्यावर पेट्रोलच्या टँकरला आग लागून स्फोट.. - ठाणे अपघात बातमी
महापे शीळ रोडवर एका पेट्रोलच्या टँकरला आग लागली आहे. आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने ती गाडी तशीच रस्त्यावर सोडून चालक गाडीच्या बाहेर आला. ही पेटती गाडी रस्त्याच्या मध्यभागी असल्याने महापे शीळ रस्त्यावरील दोन्हीकडची वाहतूक बंद करण्यात आली होती.
petrol-tanker-fire-on-mahape-sheet-road
हेही वाचा-CORONA : गर्दी कमी केली नाही तर मुंबई लोकल बंद करावी लागेल - आरोग्य मंत्री राजेश टोपे
महापे शीळ रोडवर एका पेट्रोलच्या टँकरला आग लागली आहे. आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने ती गाडी तशीच रस्त्यावर सोडून चालक गाडीच्या बाहेर आला. ही पेटती गाडी रस्त्याच्या मध्यभागी असल्याने महापे शीळ रस्त्यावरील दोन्हीकडची वाहतूक बंद करण्यात आली होती. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
Last Updated : Mar 18, 2020, 5:28 PM IST