ठाणे -भिवंडी तालुक्यातील पडघा भागात असलेल्या एका पेट्रोल पंपावर काही अनोळखी लुटारूंनी पिस्तूल सारख्या दिसणारे हत्यार दाखवून कर्मचाऱ्यांकडे असलेल्या पैसांच्या बॅग आणि मोबाइल चोरून पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलीसांनी अधिक तपास सुरू केला आहेत. मात्र पोलिसांच्या नोंदीत पिस्तूल ऐवजी लोखंडी पाईपा सारख्या वस्तु असे उल्लेख केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे ? हा लुटीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
जीवेठार मारण्याची धमकी देत लुटमारी :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई-नाशिक मार्गावर पडघा गावा नजीक डोहाले येथील जाई पेट्रोल पंप आहे. सात मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एक सिल्व्हर रंगाची ऍक्टिवा मोटरसायकल वरून तीन अनोळखी लुटारु तोंडाला कपडा बांधून आले. त्यावेळी पेट्रोल पंपच्या पॉईंटवर कार्यरत कर्मचाऱ्यांना बंदूक सारखी दिसणारी वस्तु दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. सर्व कर्मचारी घाबरले, तसेच एका कर्मचाऱ्याकडे असलेल्या पैसांच्या बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतल्या.