ठाणेDurgadi Fort Fraud Case : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन अश्या कल्याण पश्चिम भागातील ऐतिहासिक दुर्गाडी किल्लाचे बनावट कागदपत्रे तयार (Durgadi Fort Forged Document) करून, किल्लाच नावावर करणाऱ्या ठगाला महात्मा फुले चौक पोलिसांनी सापळा रचून नवीमुंबई परिसरातून अटक केली आहे. सुयश शिर्के असे अटक केलेल्या आरोपीच नाव असून तो नवीमुंबईतील खांदा कॉलनी परिसरात राहणार आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे केलं काम : बंटी–बबली या हिंदी चित्रपटात ताजमहल आपल्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून विक्री करण्याचा प्रसंग या दाखविण्यात आला होता. अश्याच प्रकारे कल्याण मधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्लाच्या जागेचे वंशज दाखूवन, बनावट कागदपत्रांच्या आधारे शिर्केने आपल्या नावाने केला. मात्र जागा विक्री होण्यापूर्वीच हा प्रकार कल्याण मंडळ अधिकारी प्रीती घुडे यांच्यामुळे उघडकीस आला आहे. घुडे यांनी २ नोव्हेंबर रोजी सुयश शिर्के (सातवाहन ) यांच्यावर भादंवि कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८, ४७१ , ७७३, प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
कागदपत्रांवर शिक्के आणि बनावट सह्या : अटक सुयश शिर्के याने १२ सप्टेंबर २०२२ रोजी किल्ल्याची जागा आपल्या नावाने करण्यासाठी नाहरकत दाखल्यासाठी अर्ज दिला होता. या अर्जात त्याने शिर्के (सातवाहन) राजाचे वंशज आणि वारसदार असल्याचा उल्लेख केला होता. कल्याण तहसील कार्यालयातील ५ ते ७ कागदपत्रांवर शिक्के आणि बनावट सह्या असलेले कागदपत्र अर्जसोबत जोडले होते. सदरच्या जागेचे प्रकरण ऐतिहासिक किल्ल्याविषयी असल्याने मंजुरीसाठी जिल्हा अधिकारी कार्यलयात पाठविण्यात आले होते.