ठाणे- ग्रामीण भागांमध्ये आतापर्यंत पाच टक्केही इंटरनेट वापरले जात नाही. कारण, उत्पन्न मिळत नसल्याने मोबाईल कंपन्या या ठिकाणी व्यवस्थितपणे सुविधा देत नाही. यामुळे ऑानलाइन पद्धती होणारी कामे शहरी भागात व्यवस्थित होतात. पण, ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे शहरी व ग्रामीण बागात इंटरनेटची मोठी दरी पहायला मिळत आहे.
2011साली केंद्र सरकारने लाखो ग्रामीण भागात असलेल्या खेड्यापाड्यांमध्ये इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी योजना आखली होती. मात्र, ही योजना आजही कागदावर ती असल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागातील शाळा, रुग्णालय आणि आवश्यक असलेल्या महसूल विभागाचे काम देखील आजही कागदोपत्री पूर्ण केले जाते. इंटरनेटचा भाव आणि तंत्रज्ञानाची कमतरता या दोन्ही कारणांमुळे आजही ग्रामीण भाग इंटरनेटच्या बाबतीत मागास राहिलेला आहे.
सरकारी कंपनी सुविधा पुरविण्यास असमर्थ