नवी मुंबई - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नेरुळ येथील आगरी कोळी भवन निवडणूक कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २० एप्रिल ते २५ मेपर्यंत आरक्षित केलं आहे. तब्बल दीड महिना हे सभागृह आरक्षित असल्याने या कालावधीत याठिकाणी होणारे लग्नसमारंभांचे काय होणार?, हा मोठा प्रश्न समोर येत आहे.
निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे लग्नाळू त्रस्त.. मुंबईत ३५ लग्न समारंभ अडचणीत - nerul
सभागृह आरक्षित करून देखील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या ३५ कुटुंबातील नागरिकांना आता लग्नासाठी नवीन सभागृहाचा शोध घ्यावा लागत आहे.
या भवनामध्ये निवडणुकीच्या कालावधीत ३५ लग्नसमारंभ होणार आहेत. जे ६ महिन्याआधीपासून आरक्षित करण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आगरी कोळी भवन निवडणूक कामासाठी आरक्षित केल्याने या सर्व कुटुंबांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सभागृह आरक्षित करून देखील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या ३५ कुटुंबातील नागरिकांना आता लग्नासाठी नवीन सभागृहाचा शोध घ्यावा लागत आहे. यातील अनेक कुटुंबांनी लग्न पत्रिका देखील वाटल्या असून आता ऐनवेळी नवी सभागृह भेटणे देखील शक्य होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. प्रशासनाने आता पर्यायी व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.