ठाणे - कोरोनाच्या भीतीने जवळपास चार महिने बंद असलेली ठाणे पश्चिम येथील भाजी मंडई लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने उघडण्यात आली. परंतु, नागरिकांनी मात्र तिकडे पाठ फिरवली आहे. मंडई उघडल्यानंतर येथे भाजी खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडेल असा अंदाज अनेकांनी वर्तविला होता. परंतु तो सपशेल फोल ठरला. आज सकाळपासून विविध भाज्या आणि फळे असलेले स्टॉल उघडून दुकानदार खरेदीदारांची वाट पाहत होते. परंतु अत्यंत कमी प्रमाणात नागरिक इथे खरेदीसाठी आले होते.
लॉकडाऊननंतर भाजी मंडईकडे नागरिकांची पाठ; कंटेनमेंट झोनमध्ये राज्य राखीव दल तैनात - ठाणे लेटेस्ट न्यूज
प्रशासनाने या मंडई सुरू करण्यास परवानगी दिली होती. परंतु सकाळपासून अत्यंत कमी प्रतिसाद मिळाल्याने येथील दुकानदार चिंतीत झाला आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात भाज्या आणि फळांना मोठा खप असतो, तेव्हा नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येतील अशी आशा येथील विक्रेते करत आहेत.
सोशल डिस्टन्सिंगसाठी दुकानाबाहेर सुरक्षित अंतरावर दोऱ्या बांधण्यात आल्या असून नागरिकांनी सर्व नियम अटींचे पालन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने या मंडई सुरू करण्यास परवानगी दिली होती. परंतु सकाळपासून अत्यंत कमी प्रतिसाद मिळाल्याने येथील दुकानदार चिंतीत झाला आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात भाज्या आणि फळांना मोठा खप असतो, तेव्हा नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येतील अशी आशा येथील विक्रेते करत आहेत.
राज्य राखीव दल तैनात -
ठाण्याच्या 27 हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी राज्य राखीव दलाच्या तुकड्या हॉटस्पॉट परिसरांमध्ये तैनात करण्यात आले आहेत. ठाण्याच्या वागळे इस्टेट इंदिरा नगर परिसरामध्ये मेडिकल किराणा मालाचे दुकान इत्यादी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. ठाण्याच्या भाजी मंडई परिसरातदेखील पालिका प्रशासनाने मोठ्या प्रमाणात सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या फेरीवाल्यांवर कार्यवाही केली आहे. ठाण्यात 31 जुलैपर्यंत हॉटस्पॉट भागात लॉकडाऊन असून पोलिसांकडून विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाईदेखील होताना दिसत आहे. हॉटस्पॉट भागात बॅरिकेड्स लावून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करत आहे.