ठाणे- मुंब्रा भागात आजही गर्दी पाहायला मिळाली. मुंब्रा भागतील लोक ऐकण्यास तयार नाहीत. पोलीस नाकाबंदी करून लोकांना घरी बसण्यासाठी आव्हान करत आहेत. परंतु, रमजानचा महिना आहे आणि त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात शॉपिंग करण्यासाठी बाहेर पडतात. तेच आज पाहण्यास मिळाले दुपारी मुंब्रा मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी दिसली.
रमजानमुळे मोठी गर्दी; पोलिसांची भीती नसल्यामुळे हजारो रस्त्यावर - ठाणे कोरोना न्यूज
पोलीस नाकाबंदी करून लोकांना घरी बसण्यासाठी आव्हान करत आहेत. परंतु रमजानचा महिना आहे आणि त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात शॉपिंग करण्यासाठी बाहेर पडतात.
रमजानमुळे मोठी गर्दी; पोलिसांची भीती नसल्यामुळे हजारो रस्त्यावर
आजपर्यंत मुंब्रामध्ये 37 रुग्ण हे कोरोनाबाधित आहे आणि ही संख्या थांबवायची असेल तर या गर्दीवर अंकुश लावणे गरजेचे आहे. याआधीही अशाचप्रकारे हजारो लोक गावी जाऊन देण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते. मात्र, पोलिसांचा अभाव आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अशाच प्रकारची गर्दी झाली. लॉकडाऊन सर्व निकषांचा बोजवारा उडालेला दिसत आहे.