नवी मुंबई -नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी आज (दि. 10 जून) भाजप व स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या माध्यमातून मानवी साखळी आंदोलन करत एल्गार करण्यात आला.
बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला प्रकल्पग्रस्तांचा विरोध
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी शिवसेना व महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आली. मात्र, त्याला सिडकोनेही अनुमती दिली आहे. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी विरोध केला आहे. आमचे नेते दि.बा. पाटील आहेत. ज्यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी प्राण पणास लावले आहेत. त्यामुळे त्यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा आग्रह स्थानिक भूमीपत्रांचा आहे.