महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिव्यात पालिकेच्या तोडक कारवाई विरोधात हजारो नागरिक रस्त्यावर - तोडक

दिवा परिसरात कांदळवणावर झालेल्या अनधिकृत बांधकामांवर आज (शनिवार) ठाणे महापालिकेच्या वतीने मोठी कारवाई करण्यात येत होती. मात्र, कारवाईच्या विरोधात हजारो नागरिक रस्त्यावर उतरल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना

By

Published : Sep 14, 2019, 10:45 PM IST

Updated : Sep 14, 2019, 11:42 PM IST

ठाणे- दिवा परिसरात कांदळवणावर झालेल्या अनधिकृत बांधकामांवर आज (शनिवार) ठाणे महापालिकेच्या वतीने मोठी कारवाई करण्यात येत होती. मात्र, कारवाईच्या विरोधात हजारो नागरिक रस्त्यावर उतरल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

माहिती देताना मनीष जोशी आणि भावना व्यक्त नागरिक


सहा इमारती, एक चाळ आणि एक बंगला, अशा बांधकामांवर ही कारवाई करण्यात येणार आहे. शनिवारी नागरिकांच्या विरोधामुळे केवळ एका इमारतीवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाला कारवाई करता आली. कांदळवणावर उभ्या राहिलेल्या या बांधकामांवर कारवाई होणार असल्याने २६० कुटुंबे यामुळे रस्त्यावर येणार आहेत. दरम्यान, या सर्व बांधकामाचे नळ कनेक्शन आणि वीज कनेक्शन तोडण्यात आले असून पुढच्या आठवड्यात रहिवाशांची बैठक घेऊन पुन्हा कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे.

हेही वाचा - मनसेचे विडंबनात्मक आंदोलन; 3 हजार कोटीच्या डोंबिवली विमानतळाचे केलं भूमिपूजन

दिवा आणि मुंब्रा परिसरात कांदळवणाची कत्तल करून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहे. ऑगस्ट महिन्यात या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला दिले होते. जानेवारी २०२० पर्यंत या सर्व बांधकामांवर कारवाई करून ती जमीनदोस्त करून त्यावर पुन्हा कांदळवणाची लागवड करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

हेही वाचा - सुप्रिया सुळेंसोबत गैरवर्तन प्रकरण; ठाण्यातील राष्ट्रवादी आघाडीच्या महिलांनी काळ्या साड्या घालून केला निषेध

पालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कांदळवणावर उभ्या असलेल्या ६ अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यात येणार आहे, जे प्राधान्याने न्यायालयाने सांगितले आहे . त्यामुळे मोठ्या पोलीस बंदोबस्तात शनिवारी दिवा पश्चिम परिसरात पालिकेचे अतिक्रमण विभाग कारवाई करण्यासाठी गेले होते . दरम्यान, या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात नागरिक बेघर होणार असल्याने या कारवाईला रस्त्यावर उतरून नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे अतिक्रमण विभागाला केवळ एकाच इमारतीवर कारवाई करणे शक्य झाले. या संदर्भात उल्हासनगर येथे राहणारे इराकी अरिफ नवाज यांनी उच्च न्यालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा -खाडी संवर्धनासाठी ठाणेकर सरसावले


संपूर्ण दिवा परिसरात अनधिकृत बांधकामे झाली असताना केवळ याच भागात महापालिका का कारवाई करते. जेव्हा अनधिकृत इमारत तयार होत होते, तेव्हा पालिकेच्या वतीने कारवाई होत नव्हती, मागील ४ ते ५ वर्षांपासून पालिका आमच्याकडून कर वसूल करते, नळ आणि वीजेची जोडणी असून त्याचेही बिले आम्ही भरतो, मग या इमारती अनधिकृत कशा?, असा प्रश्न इथल्या रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

२६० कुटुंबे रस्त्यावर
ठाणे महापालिकेच्या या कारवाईमुळे २६० कुटुंबे रस्त्यावर येणार असून नळ आणि वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व नागरिकांना आता या मूलभूत सुविधेपासून वंचित रहावे लागणार आहे. साई चरण इमारतींमध्ये राहणाऱ्या पोये मांगले या महिलेच्या म्हणन्यानुसार केवळ १० दिवसांपूर्वी आम्हाला पालिकेने नोटीस पाठवली असून लगेच कारवाईला देखील सुरुवात केली आहे. आम्ही नियमितपणे कर आणि पाणीपट्टी भरत आहोत . तरी देखील पालिकेच्या वतीने अशा प्रकारची कारवाई करण्यात येत आहे.

दोष कोणाचा..?
आम्ही विकासला पैसे देऊन सातबारा उतारा तपासूनच घरे घेतली. ही इमारते उभारेवेळी शासन किंवा पालिका काय करत होती?. आम्ही कायद्यानुसार पाणीपट्टी, कर, वीज बिल सर्व मागील चार ते पाच वर्षांपासून भरतो. त्यावेळीही आम्हाला काहीच सांगण्यात आले नाही. आता अचानक पालिका प्रशासन कारवाई करत आहे. ऐन पावसाळ्यात आम्ही जायचे कोठे? सांगा यात दोष कोणाचा..?, अशा भावना येथील रहिवाशांची भावना होती.

Last Updated : Sep 14, 2019, 11:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details