महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आधी मोबदला द्या; मगच घरांवर कारवाई करा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधितांचा आक्रमक पवित्रा - नवी मुंबई विमानतळ बाधित आक्रमक

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी सिडकोचे अतिक्रमण पथक पनवेल तालुक्यातील चिंचपाडा गावातील शिल्लक राहिलेल्या चार घरांवर कारवाई करण्यासाठी गुरुवारी आले होते. मात्र चिंचपाडा प्रकल्पग्रस्तांनी आधी घरांचा मोबदला द्या आणि आमच्या सर्व मागण्या मान्य करा, अशी मागणी करीत अतिक्रमण पथकाला विरोध केला.

Navi Mumbai International Airport victim aggressive
Navi Mumbai International Airport victim aggressive

By

Published : Mar 26, 2021, 4:16 PM IST

Updated : Mar 26, 2021, 4:23 PM IST

नवी मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी सिडकोचे अतिक्रमण पथक पनवेल तालुक्यातील चिंचपाडा गावातील शिल्लक राहिलेल्या चार घरांवर कारवाई करण्यासाठी गुरुवारी आले होते. मात्र चिंचपाडा प्रकल्पग्रस्तांनी आधी घरांचा मोबदला द्या आणि आमच्या सर्व मागण्या मान्य करा, अशी मागणी करीत अतिक्रमण पथकाला विरोध केला. यावेळी सिडकोच्या अतिक्रमण पथकाला विरोध करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना ताब्यात घेत पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी जमलेल्या महिलांसह लहान मुलांवर अमानुष हल्ला करून नंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधितांचा आक्रमक पवित्रा
सुविधा न दिल्याने प्रकल्पग्रस्त आक्रमक -
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीत अडथळा ठरणाऱ्या गावांतील ग्रामस्थांना वडघर, करंजाडे या ठिकाणी स्थलांतरित केले आहे. या बाधितांसाठी सिडकोने जागा दिली असली तरी त्यांना सुविधा अद्याप पुरवण्यात आल्या नसल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त करीत आहेत. सिडकोने केवळ मोकळ्या भूखंडावर प्रत्येकाला जागा आखून दिली आहे. येथे बाधितांनी आपली घरे बांधायची आहेत. मात्र तोपर्यंत बाधितांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. भाड्याने राहायला गेल्यावर तर ग्रामस्थांच्या अडचणीत अधिकच वाढ होत आहे. विमानतळ बाधितांसाठी सिडकोच्या वतीने वडघर पुष्पकनगर वसवण्यात आले. या ठिकाणी अजून कोणत्याच प्राथमिक सोयीसुविधा नसल्याने बाधित येथे राहायला गेले नाहीत. या अडचणी सिडकोने तत्काळ सोडवाव्यात यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
Last Updated : Mar 26, 2021, 4:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details