ठाणे - आज दुपारच्या सुमारास लोकमान्य टिळक टर्मिनसवरून निघालेल्या पवन एक्सप्रेसच्या इंजिनला अचानक आग लागली. इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही आग लागली. मध्य रेल्वेच्या कल्याण ठाकुर्ली रेल्वे दरम्यान असलेल्या कचरे गावानजीक ही घटना घडली.
पवन एक्सप्रेसच्या इंजिनला आग हेही वाचा-मुंबईकरांना थंडावा देणाऱ्या लोकलमधून रेल्वेला तब्बल 38 कोटी उत्पन्न
लोकमान्य टिळक टर्मिनसवरून निघालेल्या पवन एक्सप्रेसच्या इंजिनला अचानक आग लागली. या आगीमुळे इंजिनमधून धूर निघत असल्याचे इंजिन चालकाच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ एक्सप्रेस थांबली. धूर निघत असलेल्या ठिकाणी आपत्कालीन यंत्राचा वापर करून आग आटोक्यात आणली. यामुळे पुढील होणारा अनर्थ टळला. मात्र, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे प्रवासी रेल्वेच्या खाली उतरले होते.
दहा मिनिटातच पुन्हा एक्सप्रेस कल्याणच्या दिशेने रवाना होऊन कल्याण रेल्वे स्थानकातील 4 नंबर प्लॅटफॉर्मवर उभी करण्यात आली. त्याठिकाणी इंजिनमधील झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्ती करण्यात आला. त्यानंतर पवना एक्सप्रेस पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे.