महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोविड सेंटरमध्ये रुग्णांनी धरला कोळी गीतांवर ठेका - ठाणे कोविड सेंटर रुग्ण डान्स न्यूज

कोरोनामुळे सर्वजण एक प्रकारच्या तणावाखाली दिसत आहेत. त्यात जर कोरोनाची लागण झाली तर मग रुग्ण हवालदिलच होतो. त्यांचा ताण कमी करण्यासाठी रुग्णालये विविध उपाय करत असल्याचे दिसते.

Patients
रुग्ण

By

Published : Oct 5, 2020, 3:07 PM IST

ठाणे - कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाची लागण झाली की, रुग्ण दहशतीत येतो. हा तणाव कमी करण्यासाठी ठाण्याच्या मुंब्रा-कौसा येथील कोविड सेंटरमध्ये रुग्ण धमाल मस्ती करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत कोरोनाबाधित महिला व पुरूष रुग्णांनी कोळी गीतांवर ठेका धरला आहे.

ठाण्याच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांनी डान्स केला

कोरोना झाल्याची भिती व आजाराच्या धास्तीचा या रुग्णांच्या चेहऱ्यावर लवलेशही दिसत नाही. रुग्णांच्या या जल्लोषाचा आनंद येथील डॉक्टर, परिचारिका आणि आयाही घेत असल्याचे दिसत आहे. कोरोनाबाधित रूग्ण उपचारादरम्यान तणावात असतात. अशा परिस्थितीमध्ये त्यांना तणावमुक्त करण्यासाठी रुग्णालय प्रशासन अनेक उपाय करत आहे. त्यामध्ये व्यायाम आणि डान्स थेरेपीचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details