ठाणे- मागील चार ते पाच दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने काही वेळसाठी विश्रांती घेतीली असली तरी मध्य रेल्वेवर अजूनही पावसाचा परिणाम असल्याचे दिसून येत आहे.
रेल्वेची वाहतूक उशीरा; स्थानकावर प्रवाशांची गर्दी - सेवा
मागील काही दिवस मुंबई आणि उपनगरात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आत विश्रांती घेतली आहे. तरीही मध्य रेल्वेच्या गाड्या १० ते १५ मिनिटे उशीरा धावत आहे. यामुळे रेल्वे स्थानकांत मोठी गर्दी झाली आहे.

ठाणे रेल्वे स्थानकावर उसळलेली प्रवाशांची गर्दी
रेल्वे वाहतूक उशीरा होत असल्याने प्रवाशांची झालेली गर्दी
ठाणे रेल्वे स्थानकांत आज सकाळपासून चाकरमानी आणि रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे. आज देखील मध्यरेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिरा धावत आहे. यामुळे रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. स्थानकात चेंगराचेंगरी होऊ नये. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जीआरपीएफ, आरपीएफ रेल्वे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर रेल्वेत चढताना गर्दीमुळे दोन महिला गुदमरून चक्कर येऊन पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.