ठाणे- गणेश नाईक यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य तो विचार केला आहे. योग्यवेळी मुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. रात्री चव्हाण यांनी कोकण पट्ट्यातील भाजप उमेदवारांना एबी फॅार्मचे वाटप केले. यावेळी ते बोलत होते.
पक्ष गणेश नाईकांचा योग्यवेळी विचार करणार- रवींद्र चव्हाण
रायगड जिल्हयाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी कोकण पट्ट्यातील भाजप उमेदवारांना एबी फॅार्मचे वाटप केले. ठाण्याचे आमदार संजय केळकर, नवी मुंबईचे प्रशांत ठाकूर, भिवंडीचे महेश चौगुले, ऐरोलीचे संदीप नाईक, बेलापूरच्या मंदा म्हात्रे यांना एबी फॅार्मचे वाटप करण्यात आले असून यावेळी बोलताना गणेश नाईक यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य तो विचार केला आहे. योग्यवेळी मुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाण्यातील खोपट परिसरातील भाजप पक्ष कार्यालयात रायगड जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या एबी फॅार्मचे वाटप केले असून, ठाण्याचे आमदार संजय केळकर, नवी मुंबईचे प्रशांत ठाकूर, भिवंडीचे महेश चौगुले, ऐरोलीचे संदीप नाईक, बेलापूरच्या मंदा म्हात्रे यांच्या पोलिंग एजेंटकडे या एबी फॅार्मचे वाटप करण्यात आले. तसेच नरेंद्र पवार यांच्या नाराजगी बाबत पक्षश्रेष्ठी योग्य तो विचार करतील असे देखील चव्हाण यांनी सांगितले. तर दुसरीकडे खडसे आणि तावडेंबाबत बोलताना, फॉर्म भरण्याची प्रक्रिया येत्या 4 तारखेपर्यंत असून काय ते लवकर स्पष्ट होईल, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे ३ दिवस उरले असताना अर्जांमध्ये काही चुका होऊ नयेत याचे दडपण उमेदवारांवर असते. चुका टाळण्यासाठी भाजपने एबी फॅार्म वाटपास वेळ न लावता रात्री उशीराच फॅार्मचे वाटप केले. शिवाय निवडणूकीत पोलिंग एजंट ने काय करावे? कशा प्रकारे निवडणुकीचा अर्ज भरावा? अशा विविध तांत्रिक बाबींवर रवींद्र चव्हाण यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले.