महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवी मुंबई विमानतळ नामांतरात रिपाईची उडी; शेकडो कार्यकर्ते होणार सहभागी - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतर

दि.बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे. या मागणीसाठी आज (गुरूवार) सिडको भावनांवर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्च्यात रिपाई आठवले गटाचे शेकडो कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत.

PARTICIPATED IN RIPAI GROUP MARCH OF RENAMING MUMBAI AIRPORT
मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील नामकरणात रिपाई आठवले गटाची उडी

By

Published : Jun 24, 2021, 2:06 PM IST

ठाणे -लोकनेते स्वर्गीय दि.बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे, यासाठी सर्वच स्तरावर बैठका झाल्या. ठाणे–रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्रांची मागणी होत असतानाच आज (गुरूवार) सिडको भावनांवर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. याच मागणीसाठी रिपाई आठवले गटाच्या शेकडो कार्यकत्यांनी मोर्च्यात सहभागी होत असल्याची माहिती भिवंडी तालुका अध्यक्ष भरत जाधव यांनी दिली आहे.

मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील नामकरणात रिपाई आठवले गटाची उडी
शेकडो विविध पक्षाच्या नेत्यांना व प्रमुख कार्यकत्यांना नोटीसा -

कोरोना काळात कायद्याचे उल्लंघन होऊ नये आणि कुठेही गालबोट लागू नये. यासाठी पोलिसांनी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कॉम्रेड काळू कोमास्कर, काँग्रेस पदाधिकारी संतोष केणे, संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार यांसह ७० जणांना १४९ कलमानव्ये नोटिसा बजावल्या आहेत. कोरोना काळात इतक्या मोठ्या संख्यने जमा होऊ नये. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जय मोरे यांनी दिली.

आंदोलनकर्ते खाजगी वाहनांने सिडकोकडे रवाना -

आंदोलनकर्ते आपल्या खाजगी वाहनांनी सिडकोला जाऊ शकतात, त्यामुळे त्यांना अटकाव होणार नाही. तर डोंबिवलीत भाजप पदाधिकारी शांततेच्या मार्गाने जमा होणार असून तेथून सिडकोच्या दिशेने निघाले आहेत. शहरातील वातावरण बिघडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून वाहतूक पोलिसही वाहतुक व्यवस्थेवर परिणाम होणार नाही यासाठी लक्ष ठेवून आहेत. दरम्यान या आंदोलनात मनसे व भाजप आमदारांना पोलिसांनी नोटिसा बजावल्याबाबत विचारले असता पोलिसांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले. तर संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी आम्ही शांततेच्या मार्गाने आम्ही सिडकोकडे निघालो असल्याचे सांगितले.

हेही वाचा - नवी मुंबई विमानतळ नामंतर मोर्चात मनसे आमदार राजू पाटील, दि.बा.पाटलांच्या नावाला दिले समर्थन

ABOUT THE AUTHOR

...view details