ठाणे -भिवंडी शहरात मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसात शहरातील एक अतिधोकादायक घोषित केलेल्या दुमजली इमारतींच्या बाल्कनीचा भाग कोसळण्याची दुर्घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
भरपावसात हटविला ढिगारा..
भिवंडीत अतिधोकादायक इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही
भिवंडी शहरात मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसात शहरातील एक अतिधोकादायक घोषित केलेल्या दुमजली इमारतींच्या बाल्कनीचा भाग कोसळण्याची दुर्घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
भिवंडी शहरातील प्रभाग समिती एक अंतर्गत वेताळपाडा या भागातील तळ अधिक दोन मजली घर क्रमांक १५७ ही पालिकेने अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आले होते. बुधवारी या इमारतीच्या बाल्कनीचा सज्ज अचानक कोसळला. परंतु इमारत निर्मनुष्य केली असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसून सहाय्यक आयुक्त दिलीप खाने व बीट निरीक्षक विराज भोईर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ही आपत्ती व्यवस्थापन कामगारांच्या मदतीने भरपावसात ढिगारा काढून घेतला असून संपूर्ण इमारतीचे ठेकेदारामार्फत लवकरच पूर्ण निष्कासन करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे .