ठाणे -उल्हासनगरमधील साई कुटीर इमारतीचा काहीभाग कोसळल्याने मोठा गोंधळ उडाला. सुदैवाची बाबा म्हणजे यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. महापालिकेच्या धोकादायक यादीत ही इमारत नसतानाही कशी कोसळली हा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, ढिगाऱ्याखाली अनेक वाहने दबल्याने मोठया प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
उल्हासनगरमधील 'साई कुटीर' इमारतीचा काही भाग कोसळला; ढिगाऱ्याखाली अनेक वाहनांचं नुकसान - उल्हासनगर बातमी
उल्हासनगरमधील कुटीर इमारतीचा काही भाग कोसळला. महापालिकेच्या धोकायदायक इमारतीच्या यादीत ही इमारत नाही आहे.
उल्हासनगर कॅम्प नंबर ३ भागतील साई कुटीर ही पाच माजली इमारत धोकादायक होती. दुपारच्या सुमारास इमारतीचा काही भाग कोसळला. या इमारतीत एकूण ६ सदनिका व ७ गाळे आहेत. महापालिकेच्या धोकादायक यादीत ही इमारत नसतानाही कशी कोसळली हा प्रश्न उपस्थित होत आहे. महत्वाचे म्हणजे ही इमारत मुख्य रस्त्याला लागून आहे. त्यामुळे ती जर कोसळली तर मोठी दुर्घटना होऊ शकते. महापलिकने ती लवकरात लवकर निष्कासित करावी अशी मागणी केली जात आहे. उल्हासनगर शहरात सहा महिन्यात अशाच अनेक दुर्घटना घडल्याने पुन्हा एकदा धोकादायक आणि जीर्ण झालेल्या इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.