नवी मुंबई -दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शाळा गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेतले जात आहेत. शाळा सुरू झाल्याशिवाय शाळा व्यवस्थापनाने कोणत्याही प्रकारच्या शुल्काची मागणी करू नये, अशा स्पष्टपणे सूचना देऊनही खारघरमधील इम्पेरिअन शाळेने फी न भरल्याने काही विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद करण्याचा प्रताप केला आहे. यामुळे पालकांनी शाळेबाहेर जमा होऊन शाळा प्रशासनाविरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला.
फी भरली नाही म्हणून ऑनलाइन वर्गात बसण्यास मज्जाव; खारघरमधील इम्प्रेरिअर शाळेचा प्रताप - kharghar latest news
शाळा सुरू झाल्याशिवाय शाळा व्यवस्थापनाने कोणत्याही प्रकारच्या शुल्काची मागणी पालकांकडे करू नये, असा सूचना शिक्षण मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र खारघर येथील इम्पेरिअन शाळेने फी मागितल्याने पालकांना शाळेसमोर जमा होत घोषणाबाजी केली.

शाळेसमोरील पालक
आंदोलन करताना पालक