नवी मुंबई - येत्या 22 ऑगस्टला येणाऱ्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासंबधी शासनाने नियमावली दिली आहे. त्याच अनुषंगाने पनवेलमध्ये एक अभिनव उपक्रम राबवण्यात येतोय. यानुसार पनवेल शिवसेनेच्या माध्यमातून सोसायटीमध्ये जाऊन दीड दिवसाच्या बाप्पांचे विसर्जन केले जाणार आहे. गणेश घाटावर नागरिकांची गर्दी होऊ नये त्या अनुषंगाने हा उपक्रम राबवला जात असल्याचे सांगितले.
'तुमच्या बाप्पाचं विसर्जन आम्ही करू'...सेनेचा अभिनव उपक्रम!
22 ऑगस्टला येणाऱ्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासंबधी शासनाने नियमावली दिली आहे. त्याच अनुषंगाने पनवेलमध्ये एक अभिनव उपक्रम राबवण्यात येतोय. यानुसार पनवेल शिवसेनेच्या माध्यमातून सोसायटीमध्ये जाऊन दीड दिवसाच्या बाप्पांचे विसर्जन केले जाणार आहे. गणेश घाटावर नागरिकांची गर्दी होऊ नये त्या अनुषंगाने हा उपक्रम राबवला जात असल्याचे सांगितले.
गणेशोत्सव दोन दिवसांवर आला आहे. मात्र, कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यंदा विघ्नहर्त्याच्या उत्सवातच बरीच विघ्न आहेत. मुख्य प्रश्न विसर्जनाच्या गर्दीचा आहे. यावर्षी दरवर्षी प्रमाणे विसर्जनाला गर्दी करता येणार नाही किंवा सहकुटुंब जाता येणार नाही. कोरोनाचे संकट टाळण्यासाठी आपण ही गर्दी टाळलीच पाहिजे. मात्र, गणेश मूर्ती विसर्जनाचा प्रश्न अद्याप कायम आहे. यंदा घरीच गणपती विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
'तुमच्या बाप्पाचं विसर्जन आम्ही करू', या अभिनव संकल्पने अंतर्गत पनवेलमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन गणपतीच्या मूर्तींचे गणेश घाटावर विसर्जन होणार आहे. या अभिनव उपक्रमास पनवेलमधील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या संकल्पनेअंतर्गत 94 व्यक्तींनी बाप्पाच्या विसर्जनासाठी नोंदणी केल्याची माहिती प्रथमेश सोमण यांनी दिली आहे.