महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पनवेलमध्ये शेकापला खिंडार; पाच नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश - shekap corporators join bjp

पनवेल शेकापमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. पनवेलमधील नगरसेवक हरीश केणी यांच्यासह 5 नगरसेवकांनी पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला असून, शेकापमध्ये पैसे वाल्यांना पदे दिली जात असून फक्त ठेकेदारांच न्याय दिला जात असल्याचा आरोप नगरसेवक हरेश केणी यांनी केला आहे.

panvel shekap party five corporators will join bjp
पनवेलमध्ये शेकापला खिंडार; पाच नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

By

Published : Aug 22, 2020, 4:56 PM IST

नवी मुंबई -पनवेलमध्ये पाच नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे शेतकरी कामगार पक्षात मोठं खिंडार पडले आहे. नगरसेवक हरीश केणी यांच्यासह पाच नगरसेवकांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच या नगरसेवकांनी माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

नगरसेवक हरेश केणी बोलताना...

पनवेल शेकापमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. पनवेलमधील नगरसेवक हरीश केणी यांच्यासह 5 नगरसेवकांनी पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला असून, शेकापमध्ये पैसे वाल्यांना पदे दिली जात असून फक्त कॉन्ट्रॅक्टर यांनाच न्याय दिला जात असल्याचा आरोप नगरसेवक हरेश केणी यांनी केला आहे.

हरेश केणी यांनी शेकापच्या माध्यमातून मागील विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्याविरोधात चांगली लढत दिली होती. निवडणूकीत शेकापकडून अनेक आश्वासन दिली गेली. मात्र त्याकडे केणी वारंवार दुर्लक्षचं करत राहिले.

पनवेल महापालिकेत शेकापचे 23 नगरसेवक आहेत. यातील चौघा जणांनी आधीच शेकापला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेत भाजपची ताकद आणखी वाढली आहे. हरेश केणी यांनी पक्ष सोडताना शेतकरी कामगार पक्षाचे सर्वेसर्वा जयंत पाटील आणि स्थानिक नेतृत्वावर जोरदार टीका केली आहे.

हेही वाचा -राज्यातील मंदिरे खुली करण्यास परवानगी द्यावी; प्रताप सरनाईकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

हेही वाचा -जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या मारहाणीची सीबीआय चौकशी करा - अनंत करमुसे

ABOUT THE AUTHOR

...view details