नवी मुंबई- देशात कोरोनाचे संकट तीव्र होऊ नये म्हणून लॉकडाऊन आहे.तरीही लॉकडाऊन असताना काही नागरिक, मजूर व बेघर स्थलांतर करत होते. राज्यात बेघर, निराधार व स्थलांतरीत मजूरांना स्थानिक प्रशासनाने निवारा उपलब्ध करण्यास सूचना राज्य सरकार ने दिलेल्या आहेत. आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशाने पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सध्या तीन ठिकाणी निवारागृह तयार करण्यात आलेले आहे. कर्नाळा स्पोर्ट अकॅडमी येथे आदर्श निवारागृह करण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या माध्यमातून केलेला आहे.
पनवेल महानगरपालिकेने बनविले निवारागृह; कर्नाळा स्पोर्ट अकॅडमीत होणार सातशे ते हजार लोकांची सोय - निवारागृह
पनवेल महानगरपालिकेने कर्नाळा स्पोर्ट अकॅडमीत निवारागृह बनविले आहे. यामध्ये सातशे ते हजार लोकांची राहण्याची सोय केली आहे. सर्व सोयी सुविधा असलेले आदर्श निवारागृह महापालिकेकडून बनवण्यात आले आहे.
निवारागृहात सुरूवातीला येणा-या प्रत्येकाची वैद्यकिय तपासणी व नोंदणी केली जात असून. कोणी व्यक्ती आजारी असल्यास लगेच पुढील उपचारासाठी पाठवले जात आहे . या निवारा कक्षात स्त्री व पुरुष असे वेगळे कक्ष करून सोशल डिस्टंसिंग राखून मोठ्या प्रशस्त खोल्यात राहण्याची सोय केली जात आहे. या निवारा कक्षात येणा-या लोकांचे मनोरंजन व्हावे यासाठी सामाजिक सोशल डिस्टंसिंग रात्री चित्रपट, बातम्या पाहण्यासाठी सोय महानगरपालिकेच्या माध्यमातून केली गेली आहे.
कर्नाळा स्पोर्ट अकॅडमी ही बंदिस्त असल्याने व मनपाचा व पोलिसांचा बंदोबस्त असल्याने कोणी येथून पळूनही जाणार नाही अशी व्यवस्था येथे करण्यात आली आहे. आदर्श निवारा केंद्र पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. ज्या नागरिकांना रस्त्यात थांबविण्यात आलेले आहे त्यांची या निवारागृहात राहण्याची व्यवस्था करण्यात येईल. कोणीही लॉकडाऊन मध्ये घर सोडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे