नवी मुंबई- पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा भाजपचे नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. गायकवाड यांना रायगड, ठाणे व नवी मुंबई हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. त्यांना पोलिसांनी रायगड जिल्ह्याच्या बाहेर लोणावळा येथे नेऊन सोडले आहे.
गायकवाड यांच्यावर कित्येक गुन्हे दाखल -पनवेल महापालिकेचे वादग्रस्त माजी महापौर व भाजप नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्यावर नवी मुंबई व पनवेल परिसरातून हद्दपार करण्यात आले आहे. गायकवाड यांच्यावर 35 ते 40 गुन्हे नोंद असल्याची माहिती मिळाली आहे.
पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांना गलिच्छ शिव्या दिल्याची क्लिप वायरल -वादग्रस्त नगरसेवक गायकवाड यांनी ते पनवेल महापालिकेचे उपमहापौर असताना पालिकेच्या अधिकाऱ्यांना शिव्या दिल्याची क्लिप व्हायरल झाली होती. त्यावेळी याप्रकरणी विरोधी पक्षाने गायकवाड यांच्यावर चांगलीच टिकेची झोड उठवली होती.
कोरोना नियमांचे उल्लंघन करून वाढदिवस साजरा -जगदीश गायकवाड यांचा डिसेंबर महिन्यात वाढदिवस होता. हा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला होता. या सोहळ्याला महापौर कविता चौतमोल, आमदार प्रशांत ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कित्येक लोकांनी मास्क देखील घातले नव्हते. तसेच पनवेलच्या महापौर कविता चौतमोल यांनीही मास्क घातलेले नव्हते. हा वाढदिवस फुटपाथवर साजरा करण्यात आला होता. त्यावेळी कोरोना नियमाच पालन करण्यात आले नव्हते तसेच लावणी कार्यक्रम साजरा करण्यात आला होता व कार्यक्रमाला परवानगीही नव्हती.
दोन वर्षांसाठी हद्दपार - बेकायदेशीर मोर्चे व बाळासाहेब ठाकरे यांच्या विरुद्ध देखील गायकवाड यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केले होते. यामुळे या भागात नेहमी तणावाचे वातावरण असायचे. अखेर त्यांना ठाणे, नवी मुंबई व पनवेल तालुका हद्दीतून तसेच रायगड जिल्ह्यातून पोलिसांनी दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे.
हेही वाचा -पनवेल महापालिकेच्या 15 नगरसेवकांचे निलंबन