नवी मुंबई - पनवेल महानगरपालिका हद्दीत जीवनावश्यक वस्तूंच्या व्यतिरिक्त आणखी काही दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, लोकांच्या वाढत्या गरजा पाहता आणखी काही अतिरिक्त दुकाने उघडण्यासाठी गुरुवारी पुन्हा पालिकेच्या माध्यमातून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, पनवेल परिसरात खरेदीसाठी जाताना कोरोनाचे संक्रमण होऊ नये म्हणून ओला, उबर व रिक्षाचा वापर टाळावा असेही आवाहन पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
पनवेल शहरात आणखी दुकाने उघडण्यास परवानगी, रिक्षा व ओला चालवण्यास मज्जाव - panvel corona news
पनवेल परिसरात खरेदीसाठी जाताना कोरोनाचे संक्रमण होऊ नये म्हणून ओला, उबर व रिक्षाचा वापर टाळावा असेही आवाहन पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
पनवेल शहरात आणखी दुकाने उघडण्यास परवानगी
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आता इतर दुकानांसोबत नव्याने नागरिकांच्या मागणीनुसार झेरॉक्स सेंटर, फुटवेअर शॉप्स, ऑप्टिक्स, वखार सुरू ठेवण्याची परवानगी आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे. रिक्षा आणि ओला सुरू ठेवण्याची परवानगी नसल्याने नागरिकांनी त्यांचा उपयोग करू नये, शिवाय सोशल डिस्टंन्स आणि सर्व नियमांचे काटेकोर पालन करूनच दुकने सुरू ठेवण्याचे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.