नवी मुंबई : पनवेल महापालिका क्षेत्रात गुरुवारी 44 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, 55 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
गुरुवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेलमधील 15, कामोठ्यातील 13, खारघरमधील 8, नवीन पनवेलमधील 3, कळंबोलीतील 3, तसेच आसुडगाव आणि तळोजा मध्ये प्रत्येकी एक अशा रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यत नोंद झालेल्या पनवेल महापालिका क्षेत्रातील एकूण 861 कोरोनाबाधित रूग्णांपैकी 596 रूग्ण बरे होऊन घरी परतले असून, 36 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका क्षेत्रात 229 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.