महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पनवेल महानगरपालिकेची अनधिकृत आठवडी बाजारांवर कारवाई - BMC action against unvalid market in thane

पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आज ६ नोव्हेंबरला रोडपाली आणि खांदा कॉलनीत भरणारे अनधिकृत आठवडी बाजार उधळून लावले. बाहेरून येणारे शेकडो  व्यापारी विक्रेते यांनी पथकांना पाहताच पळ काढला. त्यांना संरक्षण देणारे आणि बाजाराची अवैध वसुली करणारे वसुलीदादा देखील क्षणात गायब झाले.

पनवेल महानगरपालिकेची अनधिकृत आठवडी बाजारांवर कारवाई

By

Published : Nov 6, 2019, 11:45 PM IST

पनवेल -सामान्य नागरिकांना अतिक्रमणाचा त्रास होऊ नये, यासाठी महानगरपालिकेकडून अनधिकृत आठवडी बाजारांवर कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण सहन केले जाणार नाही, असे पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे.

पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आज ६ नोव्हेंबरला रोडपाली आणि खांदा कॉलनीत भरणारे अनधिकृत आठवडी बाजार उधळून लावले. बाहेरून येणारे शेकडो व्यापारी विक्रेते यांनी पथकांना पाहताच पळ काढला. त्यांना संरक्षण देणारे आणि बाजाराची अवैध वसुली करणारे वसुलीदादा देखील क्षणात गायब झाले.

पनवेल महानगरपालिकेची अनधिकृत आठवडी बाजारांवर कारवाई

हेही वाचा -नवी मुंबईतील सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर फेरीवाल्यांचा कचरा; नागरिकांना त्रास

पनवेल मनपा बाहेरून विक्रेते येऊन शहरात विक्री करतात. याचा त्रास स्थानिक व्यापारी व विक्रेते यांना होतोच शिवाय यामुळे वाहतुकीस अडथळा तर होतोच. तसेच कचरा होणे, बाजारात खिसे कापणे, सोनसाखळी व मोबाईल, पाकिटमारी होणे हे नित्याचे झाले होते.

पनवेल महानगरपालिकेची अनधिकृत आठवडी बाजारांवर कारवाई

आता अशा अनधिकृत बाजाराला महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने लक्ष केले आहे. ही कारवाई सातत्याने करण्यात येणार आहे, असे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले. यापूर्वी कारवाई होत नव्हती का? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. परंतु लोकसभा निवडणुका आणि पावसाळा नंतर विधानसभा निवडणुका यात सर्व व्यस्त असल्याचा गैरफायदा घेऊन अवैध व्यावसायिक पुन्हा आपला हातपाय पसरू लागले होते. मात्र, आता त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचंही उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले.

हेही वाचा -शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, युवासेनेची राज्यपालांकडे मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details