नवी मुंबई -आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत आहेत. NCB च्या एका कारवाईत पंच राहिलेल्या शेखर कांबळे यांनी देखील अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आज(27 ऑक्टोबर) शेखर कांबळे यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
- खारघर येथे नायजेरियन नागरिकावर केलेल्या ड्रग्ज कारवाईत शेखर कांबळे पंच:
खारघर येथे नायजेरियन नागरिकांवर केलेल्या ड्रग्जच्या कारवाईत शेखर काबंळे हे दुसरे पंच होते. या कारवाई दरम्यान ८ ते १० कोऱया कागदावर समीर वानखेडे यांनी सह्या घेतल्याचा आरोप शेखर कांबळे यांनी केला आहे.
हेही वाचा -समीर वानखेडे मुस्लिमच; निकाह पढवणाऱ्या मौलानांचा दावा
- अनिल माने यांनी NCB कार्यालयात बोलवल्याने आपण घाबरलो:
काल NCB कार्यालयातील अनिल माने यांनी आपल्याला फोन करून कार्यालयात बोलवले होते. त्यामुळे आपण घाबरलो असल्याने कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार केली असल्याचा खुलासा शेखर कांबळे यांनी केला आहे.
- ही कारवाई बनावट होती, शेखर यांचा आरोप:
खारघर येथील नायजेरियन ड्रग्स प्रकरणात एनसीबीने केलेल्या ८०/२०२१ या प्रकरणातील पंच शेखर कांबळे आता समोर आले आहेत. नायजेरियन ड्रग्स प्रकरणात कांबळे यांच्या पंच म्हणून १० ते १२ कोऱ्या कागदांवर सह्या घेण्यात आल्या, असे त्यांनी सांगितले. तसेच ते समीर वानखेडे आणि एनसीबीचे अधिकारी अनिल माने यांच्या संपर्कात होते, असे कांबळे यांनी सांगितले. त्यामुळे ही कारवाई बनावट होती. यामधील जे नायजेरियन होते ते पळून गेले होते, असाही कांबळे यांनी खुलासा केला आहे. त्यामुळे एनसीबीच्या कारवाईवर आणि समीर वानखेडे यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हेही वाचा -Aryan Khan Drug Case : आजची रात्र कारागृहातच, कोर्टाचे कामकाज संपल्याने सुनावणी उद्यावर