ठाणे- जिल्ह्यात कारगिल युध्दाचा 20 वा विजय दिन व माजी सैनिक संम्मेलनाचा कार्यक्रम नियोजन भवन येथे पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याहस्ते दिप प्रज्वलन करुन हुतात्मा जवान स्मृती प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून पाकिस्तानच्या विविध प्रांतातून स्थलांतरित झालेल्या ठाणे जिल्ह्यातील ३० सिंधी बांधवाना भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्हाधिकारी व आमदार गुरुमुक जगवानी यांच्याहस्ते हे प्रमाणपत्र देण्यात आले.
पाकिस्तानच्या ३० नागरिकांना मिळाले भारतीय नागरिकत्व
ठाणे, नवी मुंबई,कल्याण या भागातील सिंधी बांधवांच्या कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना भारतीय नागरिकत्व बहाल केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अनेक दशकापासून ही पद्धत आपल्या प्रशासनाकडे आहे. केंद्र शासनाने याबाबतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान केलेले आहेत. ठाणे, नवी मुंबई,कल्याण या भागातील सिंधी बांधवांच्या कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना भारतीय नागरिकत्व बहाल केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी ठाण्यातील वीर पत्नी मीरा देवी, सत्याराणा, बेबी जॉन सी, सुप्रिया सुधीर आंब्रे यांना सन्मानित करण्यात आले. सोबतच कारगिल युध्दात सहभागी झालेले माजी सैनिक संजय चौधरी, संजय पवार, कॅप्टन मिश्रा यांना जिल्हाधिकाऱयांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास निमंत्रित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकाच्या विधवा, युध्द विधवा, माजी सैनिक संघटना यांच्या समस्या व अडचणींचे निवारण करण्यात आले.