महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शाळा परिसरात मिळणाऱ्या जंक फूड विरोधात विशेष मोहीम; अन्न औषध प्रशासन मारणार छापे - schools

शाळा आणि शाळेबाहेर मिळणाऱ्या जंक फूड विरोधात आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मोहीम उघडली आहे. शाळेबाहेरच्या परिसरात जंक फूड विकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

अन्न औषध प्रशासन

By

Published : Jul 19, 2019, 11:05 AM IST

ठाणे- शाळा आणि शाळा परिसरात मिळणाऱ्या जंक फूड विरोधात आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मोहीम उघडली आहे. शाळेबाहेरच्या परिसरात जंक फूड विकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच शाळेत मिळणाऱ्या अन्नावरही विशेष लक्ष दिले जाणार आहे. शाळेत पौष्टिक आणि सकस अन्न पदार्थ विद्यार्थ्यांना मिळावेत, असा यामागचा उद्देश असल्याचं मंत्री जयकुमार रावल आणि अन्न औषध प्रशासन मुख्य अधिकारी पल्लवी दराडे यांनी स्पष्ट केले.

जंक फूड विरोधात अन्न आणि औषध प्रशासन विभागाची मोहीम

शाळा आणि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना पौष्टीक आणि सकस आहार मिळावा या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत ठाण्यामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अशाप्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम असल्याचे सांगण्यात आले. या माध्यमातून शाळा आणि महाविद्यालयामध्ये दिल्या जाणाऱ्या आहारावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये जंक फूड खाल्याने अनेक आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. तो रोखण्यासाठी प्रशासनाने ही मोहीम आखल्याचे जयकुमार रावल यांनी सांगितले.

शाळेतील मुलांना जादा मीठ, साखर आणि मेदयुक्त म्हणजेच जंक फूड पासून लांब ठेवण्यासाठी राष्ट्रीय पोषण संस्थेमार्फत एक समिती बनवली होती. या समितीने दिलेल्या सुचनेनुसार या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते.

शाळेत मिळणाऱ्या जंक फुड मध्ये साखर, मीठ, मेद युक्त आणि चरबीयुक्त पदार्थांचा जास्त समावेश असतो. यामुळे शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा, दातांचे विकार, मधुमेह आणि हृदयरोगा सारखे आजार उद्भवू लागलेत. या सर्व आजारांना आळा बसावा आणि विद्यार्थ्यांना सकस व पौष्टिक आहार मिळावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याच बरोबर अशा प्रकारच्या जनजागृतीमध्ये शाळा, विद्यार्थी आणि पालक यांचा किती सहभाग आहे याची नोंद घेण्यासाठी पालक, विद्यार्थी, शाळा, शिक्षण विभाग आणि विविध संस्थांची एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती जंक फूड विरोधात जनजागृती देखील करेल.

ABOUT THE AUTHOR

...view details