नवी मुंबई -बेलापूर सीबीडी येथील दिवाणी न्यायालयात 12 डिसेंबरला ऑनलाईन पद्धतीने लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. ही लोकअदालत गुगल मिट, वेब वे यासारख्या माध्यमातून पार पडणार असल्याने, फिर्यादीला प्रत्यक्ष कोर्टात हजर राहण्याची गरज नाही.
दखल पूर्व प्रलंबित बँक वसुली, वीज बिलाची थकीत रक्कम, पाणीपट्टी, तडजोड योग्य फौजदारी खटले, धनादेश न वठणे, मोटार अपघात न्यायाधिकरणाचा दावा, या सारख्या दाव्यांची न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यास त्याला वेळ लागतो. मात्र लोकअदालतीच्या माध्यमातून असे खटले लवकरात लवकर मार्गी लागतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन लोकअदालतीचे आयोजन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १२ डिसेंबरला बेलापूर सीबीडी येथील दिवाणी न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्यांदाच आरोपी, फिर्यादी कोर्टात हजर न राहता ही लोकअदालत पार पडणार आहे. गुगल मिट वेब वे यासारख्या माध्यमातून खटल्यांची सुनावणी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. या पद्धतीने खटल्याच्या सुनावणीसाठी 10 डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती न्यायाधीश तृप्ती देशमुख नाईक यांनी दिली आहे.