ठाणे - महापालिकेचा २०२०-२१ चा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. या वेळी, सत्ताधारी शिवसेनेचे स्थायी समिती सभापती आणि आयुक्त विपीन शर्मा यांना पालिकेतील विरोधकांनी चांगलेच अडचणीत आणले. घोषणाबाजी करत अर्थसंकल्पावेळी विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला.
ठाण्यात पालिका अर्थसंकल्पावेळी विरोधकांचा गोंधळ - Thane Municipal Budget News
आज अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच स्थायी समिती सदस्यांनी मोठा गोंधळ घातला. मागच्या दोन अर्थसंकल्पाची किती अंमलबजावणी झाली. ४४५ कोटींची यादी कोणी तयार केली, अशा मुद्द्यावरून सद्यस्यांनी सभागृहातच जोरदार घोषणाबाजी केली. या सर्व गोंधळातच पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी अर्थसंकल्प सादर केला.
हेही वाचा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर; लोणार सरोवराचीही करणार पाहणी
आज अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच स्थायी समिती सदस्यांनी मोठा गोंधळ घातला. मागच्या दोन अर्थसंकल्पाची किती अंमलबजावणी झाली. ४४५ कोटींची यादी कोणी तयार केली, अशा मुद्द्यावरून सद्यस्यांनी सभागृहातच जोरदार घोषणाबाजी केली. या सर्व गोंधळातच पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी अर्थसंकल्प सादर केला. आधीचा अर्थसंकल्प मंजूर झाला याची माहिती देण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी केली. १३१ नगरसेवक आणि सभागृहाचा अपमान असून वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला. सभागृहात गोंधळ घालून पालिका ४५० कोटींचा घोटाळा उघड झाला पाहिजे, हा सर्व प्रकार म्हणजे चोरी असल्याचा आरोप विरोधकांनी करत घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली.
काँग्रेसमधील बंड उघड
या गोंधळात काँग्रेसमधील नेते विक्रांत चव्हाण यांनी माईकचा ताबा घेत सत्ताधारी आणि प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. ठाण्यात काँग्रेसचे नगरसेवक कुरेशी यांना विक्रांत चव्हाण यांनी आपण काँग्रेसमध्ये आहात ना, मग विरोधात का उतरत नाही, असा सवाल केला. तर, या प्रकारावर चिडलेल्या कुरेशी यांनी मी शिवसेनेसोबत असल्याचे सांगत विरोध करणार नाही, असे माईकवर उत्तर दिले.
हेही वाचा -माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात वीज केंद्राला ठोकले टाळे