महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाच हजारांच्या तुटपुंज्या मदतीपेक्षा नाट्यगृहे सुरू करा, कलावंतांची मागणी - ठाणे जिल्हा बातमी

कोरोनामुळे राज्यातील नाट्यगृह बंद आहेत. यामुळे अनेक लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 56 हजार कलारांना 5 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. ही मदत तुटपुंजी असून सरकाने नाट्यगृह सुरू करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी कलाकारांच्या वतीने करण्यात येत आहे.

नाट्य कलावंत
नाट्य कलावंत

By

Published : Aug 7, 2021, 3:05 PM IST

Updated : Aug 7, 2021, 5:11 PM IST

ठाणे -राज्यातील कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंध असल्याने अनेक कलाकारांवर आर्थिक संकट ओढावले आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील 56 हजार कलाकारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र, ही मदत तुटपुंजी असल्याने अनेक कलाकारांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

आपले म्हणणे मांडताना कलावंत

राज्यात कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण कमी आल्याने सरकारने निर्बंध शिथील केली आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे कलाकारांच्या पदरी मात्र निराशाच पडली आहे. सरकारने त्यांना पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही मदत तुटपुंजी असल्याने अनेक कलाकारांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला सरकारने मदत न करता नाट्यगृहे आणि सिनेमागृहे सुरू ठेवण्याची मुभा द्यावी, अशी मागणी कलाकारांनी केली आहे. कलाकारांच्या या मागणीवर सरकार कोणती भूमिका घेईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा -'तू मर जा' असे प्रेयसीने म्हणताच, प्रियकराची फेसबुक लाइव्ह करत आत्महत्या

Last Updated : Aug 7, 2021, 5:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details