ठाणे -नौपाड्यातील एका ६४ वर्षीय नागरिकाची ७ लाख ९९ हजार ९९७ रुपयांची फसवणूक झाली. गुरुवारी हा ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार घडला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यात ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाईन फसवणूक; लाखो रुपयांचे नुकसान - ऑनलाईन फसवणूक
एका ६४ वर्षीय नागरिकाची ७ लाख ९९ हजार ९९७ रुपयांची फसवणूक झाली. गुरुवारी हा ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार घडला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
नौपाड्यातील खोपट भागात राहत हे तक्रारदार व्यावसायिक राहतात. गुरवारी १५ एप्रिलला दुपारी त्यांच्या मोबाईलवर राहूल मिश्रा या अनोळखी व्यक्तीने फोन केला. तुमचे पेटीएम बंद झाले असून तुमची केवायसी रिन्यू करावी लागणार आहे, अशी त्याने बतावणी केली. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून या ज्येष्ठ व्यावसायिकाने गुगलद्वारे एका नवीन अॅप आणि कॅनरा बँकेचे मोबाईल अॅप सुरू केले.
त्यानंतर त्यांना बोलण्यात गुंतवून आरोपीने दुपारी ४ वाजून १२ मिनिट ते ७ वाजून १४ मिनिटांच्या कालावधीमध्ये त्यांच्या पेटीएम आणि कॅनरा बँकेच्या खात्यातील ७ लाख ९९ हजार ९९७ रुपयांची रक्कम अन्य बँक खात्यामध्ये ऑनलाईन वळती केली. नंतर या व्यावसायिकाने बँकेशी संपर्क साधला असता, अशी कोणतीही केवायसी मागितली नसल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी राऊत याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.