नवी मुंबई - गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर वाढून घाऊक बाजारातच 50 ते 55 रुपये किलोने कांद्याची विक्री झाली होती. मात्र, सद्यस्थितीत कांद्याचा चांगलाच तुटवडा भासत असून नवी मुंबईतील मुंबई कृषी उपत्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या कांद्याची आवक घटली आहे. त्यामुळे घाऊक बाजारातही कांद्याने नव्वदी गाठली आहे. जुना छोटा कांदा प्रतिकिलो 40 रुपये किलोने विकला जात आहे.
हेही वाचा - मानवी साखळीनंतर मनसेचे टोलमुक्तीसाठी धरणे आंदोलन
यंदाच्या ओल्या दुष्काळाचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. याचाच परिणाम म्हणून आज मंगळवारी कांद्याला घाऊक बाजारात उच्चांकी दर मिळाला. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा-बटाटा विभागात कांद्याला 100 ते 120 रुपये प्रति किलो दर मिळाला. मार्केटयार्डात आज फक्त 90 ट्रक कांद्याची आवक झाली. यामध्ये जुन्या कांद्याचे 15 ट्रक तर नवीन कांद्याचे 75 ट्रक इतकी आवक झाली. चांगल्या प्रतिच्या नवीन कांदा बाजारपेठेत दाखल होण्यासाठी आणखी 1 महिन्याचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत कांद्याचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - कतारमधील नेमबाज स्पर्धेत ठाण्यातील रुद्रांश पाटीलचा सुवर्ण वेध; ऑलिंम्पिकमध्येही पदक जिंकण्याचा विश्वास